-
बॉलिवूडमधील लोकप्रिय डान्सर म्हणून नोरा फतेही चांगलीच लोकप्रिय आहे. याबरोबरच ती वेगवेगळ्या रीयालिटि शोमध्ये परीक्षक म्हणूनही भूमिका बजावते.
-
नुकतंच बांगलादेश सरकारने तिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
-
नोरा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
तिचे डान्स व्हिडिओज आणि तिचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात.
-
नुकतंच नोराने मॉरिशसमधील काही फोटोज तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर शेअर केले.
-
नोरा सध्या मॉरिशसमध्ये सुट्टीनिमित्त फिरायला गेली आहे. या ट्रीपमधले तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोमध्ये नोराबरोबर एक व्यक्ती दिसत आहे. तिने हे फोटो शेअर केल्यानंतर ती व्यक्ती कोण आहे याविषयीच सध्या चर्चा सुरू आहे.
-
याचे नाव मार्स पेद्रोझो आहे. हा नोराचा हेअर स्टायलिस्ट आहे. नोरा मॉरिशसमध्ये त्याच्याबरोबर सध्या सुट्टीचा आस्वाद घेत आहे.
-
मार्सने याआधीही क्रीती सनॉन, दिशा पाटनी अशा बॉलिवूड अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे.
-
नोरा आणि मार्सच्या या व्हायरल फोटोमुळे सोशल मीडियावर त्यांच्यात अफेअर सुरू असल्याच्या चर्चा होत आहेत.
-
मार्स सध्या मनोरंजनसृष्टीत चांगलाच कार्यरत आहे.
-
नोरा सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगणच्या आगामी ‘थॅंक गॉड’ चित्रपटात झळकणार आहे. ते गाणं सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम / नोरा फतेही, मार्स पेद्रोझो)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स