-
झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा लोकप्रिय कार्यक्रम कायमच चर्चेत असतो. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात अनेक राजकीय मंडळी सहभागी झाली आहेत.
-
नुकतंच प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ सहभागी झाले होते.
-
या कार्यक्रमात छगन भुजबळ यांना विविध गोष्टींबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते.
-
‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता निलेश साबळे याने छगन भुजबळांना विविध प्रश्न विचारले.
-
यावेळी त्यांनी राजकीय विषयांसह अनेक कौटुंबिक विषयांवरही मोकळ्या गप्पा मारल्या.
-
या कार्यक्रमादरम्यान ते गळ्यात मफलर का घालतात याबद्दल भाऊ कदम यांनी विनोदी स्किट सादर केले.
-
या दरम्यान भाऊ कदम यांनी त्यांच्याकडे वेगवेगळे मफलर आहे. ते एकदा परिधान केलेला मफलर पुन्हा वापरत नाही, असेही सांगितले.
-
या सादरीकरणानंतर छगन भुजबळ यांना तुम्ही गळ्यात नेहमी मफलर का परिधान करता? असा प्रश्न निलेश साबळेने विचारला.
-
तसेच तुम्हाला ही स्टाईल तुम्हाला कशी सुचली? असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला.
-
त्यावर त्यांनी यामागचे खरे कारण सांगितले.
-
यावेळी ते म्हणाले, “खरं सांगायचं तर माझ्या डाव्या खांद्याचे ऑपरेशन झाले होते.”
-
“त्यावेळी त्याला थंडी वैगरे लागू नये म्हणून मग मी मफलर परिधान करायचा असे ठरवले.”
-
“त्यानंतर मग प्रत्येकाची काही तरी स्टाईल असते, हे मला जाणवले.”
-
“मग माझीही काही तरी स्टाईल असावी, असे मला वाटलं.”
-
“त्यात ही स्टाईल मलाही आवडायला लागली.”
-
“त्यामुळे मी ते मफलर घालायला लागलो.”
-
“त्यामुळे मी आता कुठेही गेलो तरी मला शाल देणं टाळतात आणि त्याऐवजी मफलर दिले जातात.”
-
“शाल जोड्यातले पण देतात. पण शालींची संख्या कमी झाली आहे.”
-
“कुठेही फिरायला गेलो किंवा एखाद्या सभेला गेलो की तिकडेही मफलर दिले जातात.”
-
“त्यामुळे आपोआप मफलरचा ढीग वाढत चालला आहे.”
-
“मला कार्यक्रमाला जाण्यापूर्वी जे मफलर हातात येते ते मी परिधान करतो”, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.

“भर रस्त्यात निपचित पडलेली महाराष्ट्राची…”, तरुणाला विवस्त्र करून मारहाणीचा व्हिडीओ पाहून रोहित पवारांचा संताप