-
अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर खूपच चर्चेत आली.
-
2020 मध्ये सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिला सुमारे 28 दिवस भायखळा तुरुंगात राहावे लागले होते.
-
रिया तुरुंगात असताना तिचे तेथील आयुष्य कसे होते याबद्दल आता अनेक गोष्टी समोर आल्या आहेत.
-
मानवाधिकार वकील आणि कामगार संघटना या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुधा भारद्वाज यांनी तुरुंगात रियाचे आयुष्य कसे होते याबद्दल भाष्य केले आहे.
-
रियाची इतर कैद्यांशी चांगली वागणूक होती. त्यांनाही रिया खूप आवडायची.
-
एखाद्या तरुणाला अशा परिस्थितीत टाकल्याने तो खूप अस्वस्थ होतो. पण रियाने धीर सोडला नाही.
-
ती सर्वांशी प्रेमाने वागायची.
-
लहान मुलांबरोबरही तिची छान मैत्री झाली होती.
-
ती तेथून परतत असताना तिच्या खात्यात जे काही पैसे शिल्लक होते, त्यातून सर्वांना मिठाई वाटली. त्यासोबतच तिने कैद्यांबरोबर नाचही केला.
-
सर्व कैदी तिला निरोप देण्यासाठी गेटवर आले होते.
-
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर तपासात समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० रोजी अटक करण्यात आली होती.
-
जवळपास १ महिना तुरुंगात राहिल्यानंतर रियाचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने मान्य केला होता.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख