-
कपूर घराण्यातील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे करिष्मा कपूर, नव्वदच्या दशकात तिने आपल्या अभिनयातील कारकिर्दीला सुरवात केली.
-
करिश्मा कपूरचं दिल्लीतील व्यावसायिक संजय कपूर याच्याशी २००३ मध्ये लग्न झालं होतं. या लग्नापासून तिला मुलगी समायरा आणि मुलगा कियान अशी दोन मुलं आहेत.
-
२०१४ मध्ये या दोघांचं नातं संपल्याचं जाहीर झालं आणि २०१६ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
-
आपल्या अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे मनीष कोईराला, आपल्या कारकिर्दीत तिने अनेक चित्रपटात काम केले आहे.
-
मनीषा मूळची नेपाळी असून तिकडचा उद्योगपती म्राट दहलशी लग्न केले. मात्र त्यांचे नाते केवळ केवळ दोन वर्षे टिकले.
-
मनीषाची बॉलिवूडमधील प्रेमप्रकरणं गाजली मात्र तिने दुसरे लग्न केले नाही.
-
महेश भट यांची धाकटी मुलगी आलिया भट सध्या चर्चेत आहे मात्र त्यांच्या पहिल्या मुलीने म्हणजे पूजा भटने नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
-
या अभिनेत्रीने मनीष माखिजासोबत लग्न केले होते. या लग्नाच्या ११ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.
-
हे नाते नाते तुटल्यानंतर पूजा नैराश्यात गेली होती. मात्र ती आता पुन्हा अभिनयनात, दिग्दर्शनात सक्रिय झाली आहे.
-
‘बेताब’ चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे अमृता सिंग. या चित्रपटानंतर ती खूप प्रसिद्ध झाली आणि तिच्याकडे चित्रपटांची रांग लागली होती.
-
अमृता सिंगने आपल्याहून १२ वर्षांनी लहान असणाऱ्या सैफ अली खानशी लग्न केले होते. लग्नानंतर १३ वर्षांनी ते वेगळे झाले.
-
सैफने अभिनेत्री करीनाबरोबर लग्न केले. मात्र अमृताने दुसरे लग्न केले नाही. दोघांना इब्राहीम आणि सारा अशी दोन अपत्य आहेत. फोटो सौजन्य : इंडियन एक्स्प्रेस

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य