-
दरवर्षी दिवाळी आली की मोती साबणाची जाहिरात घरोघरी टीव्हीवर पाहायला मिळते.
-
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ हे वाक्य अगदी लहानांपासून मोठ्यांचे तोंडपाठ झाले आहे.
-
‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली’ हे वाक्य आणि दिवाळी जसं काही एक समीकरणचं झालं आहे.
-
मोती साबणाच्या जाहिरातीतून घरोघरी पोहोचलेले ‘अलार्म काका’ म्हणून ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांना ओळखले जाते.
-
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांची आज पहिली पुण्यतिथी. गेल्यावर्षी २१ सप्टेंबर २०२१ ला त्यांचे निधन झाले.
-
मोती साबणाच्या जाहिरातीमध्ये दिसणारे आजोबा म्हणून ते घराघरात पोहोचले.
-
विद्याधर करमरकर यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.
-
विद्याधर करमरकर यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले होते. अनेक जाहिरातीतही ते झळकले.
-
आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे.
-
विलेपार्ले येथे राहणाऱ्या करमरकरांनी नोकरी सांभाळून अभिनयाची आवड जोपासली होती.
-
विद्याधर करमरकर यांनी अनेक जाहिरात आणि चित्रपटातून आतापर्यंत छोट्य़ा छोट्या भूमिकांच्या साकारल्या होत्या. त्याबरोबरच अनेक हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले होते.
-
‘कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे.
-
अनेक हिंदी चित्रपटात ते वडील किंवा आजोबांच्या भूमिकेत पाहायला मिळायचे. फक्त चित्रपट नव्हे तर त्यांच्या जाहिरातीही प्रचंड गाजल्या.
-
दिवाळीदरम्यान टीव्हीवर प्रसिद्ध होणाऱ्या मोती साबणाच्या जाहिरातीत ते झळकले होते. त्यात त्यांनी ‘अलार्म काकां’ची भूमिका साकारली होती.
-
याबरोबर त्यांनी इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट यासारख्या जाहिरातीतही काम केलं होतं.
-
त्यांनी अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केले. त्यासोबत काही चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.
-
विद्याधर करमरकर यांच्या निधनाला वर्ष उलटले असले तरीही सिनेसृष्टीत त्यांची कमतरता जाणवत आहे.
-
विद्याधर करमरकर यांच्या निधनाला वर्ष उलटले असले तरी पुढच्या अनेक दिवाळीत त्यांची जाहिरात पाहिल्यावर आपल्याला त्या आजोबांची आठवण नव्याने ताजी झाल्याशिवाय राहणार नाही.
चहा बदलून द्या म्हणून सांगितल्यामुळे पुणे येथील पर्यटकाला कुडाळ जवळ महामार्गावर झाराप झीरो पाॅंईट येथे दोरीने बांधून बेदम मारहाण