-
एकेकाळी ज्या गायिकेची तुलना थेट लता मंगेशकर यांच्याशी केली जायची अशा अनुराधा पौडवाल यांनी संगीत क्षेत्रात पुनरागमन केलं आहे.
-
तब्बल १८ वर्षांनंतर ‘कुलस्वामिनी’ या मराठी चित्रपटातील गाण्याला अनुराधा पौडवाल यांनी आवाज दिला असून हे गाणं आज लाँच करण्यात आलं आहे. हा चित्रपट पुढील महिन्यात ११ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.
-
मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणाऱ्या गायिका अनुराधा पौडवाल यांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीत असंख्य गाजलेल्या गाण्यांसाठी आपला आवाज दिला आहे.
-
त्यांनी १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अभिमान’ या हिंदी चित्रपटातून आपल्या गायनाच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली.
-
त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. एकाहून एक सरस अशा चित्रपटात त्यांना पार्श्वगायिका म्हणून घेतलं जायचं.
-
‘आशिकी’ या सुपरहीट चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणी अजूनही संगीतप्रेमी तितक्याच आवडीने ऐकतात.
-
याबरोबरच ‘सडक’, ‘दिल है की मानता नहिं’ अशा काही चित्रपटातील गाणीही चांगलीच गाजली.
-
असं म्हंटलं जातं की त्यावेळी अनुराधा यांनी फक्त गुलशन कुमार यांच्या ‘टी-सीरिज’साठी गाण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळेच त्यांच्या करकीर्दीला उतरती कळा लागली.
-
हळूहळू त्यांना चित्रपटातील गाणी मिळायचंही बंद झालं आणि त्यांनी आपला मोर्चा भजन आणि भक्तिगीत याकडे वळवला.
-
गुलशन कुमार यांच्या मृत्यूमुळे त्यांना आणखी जास्त धक्का बसला.
-
अनुराधा यांनी १० वर्षांहून अधिक काळ टी सीरिजसाठी काम केलं, पण गुलशन कुमार यांच्या मृत्यूनंतर त्या संगीतक्षेत्रातून पूर्णपणे बाहेर फेकल्या गेल्या.
-
आत्तापर्यंत अनुराधा पौडवाल यांनी मराठी आणि हिंदीबरोबरच तमिळ, ओडिया, नेपाळी, बंगाली आणि कानडी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. (फोटो सौजन्य : फेसबुक / अनुराधा पौडवाल आणि इंडियन एक्सप्रेस)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच