-
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ गेले काही दिवस वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात दाखवलेल्या काही प्रसंगांवर अनेकांनी आक्षेप घेत या चित्रपटाबद्दल तक्रार केली.
-
या आगामी चित्रपट ‘थँक गॉड’मध्ये तो चित्रगुप्ताची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण या भूमिकेमुळे तो अडचणीत आला आहे.
-
तसेच या चित्रपटात अजय देवगणसह सिद्धार्थ मल्होत्रा आणि राकुल प्रीतची महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
-
इंद्र कुमार दिग्दर्शित ‘थँक गॉड’ या चित्रपटाला शुक्रवारी सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून U/A प्रमाणपत्र मिळाले आहे.
-
पण सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाच्या निर्मात्यांना या चित्रपटात काही बदल सुचवले आहेत. त्यानुसार चित्रपटाच्या रिलीजच्या तीन दिवस आधी या चित्रपटात काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
-
या चित्रपटातील एका फ्रेममध्ये दारूच्या ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसत होता. हा लोगो ब्लर करण्यात येणार आहे.
-
चित्रपटाच्या सुरुवातीला लिहिलेल्या प्रस्ताविकाच्या मजकूरतही बदल करण्यात येणार आहे. त्यासोबत हे प्रस्ताविक प्रेक्षकांना नीट वाचता यावे यासाठी या प्रस्ताविकाचा स्क्रीन टाईमही वाढवण्यात येणार आहे.
-
इतकेच नव्हे तर, चित्रगुप्त या भूमिकेचे नाव बदलून ‘सीजी’, तर यमदूत या व्यक्तीरेखेचे नाव बदलून ‘वायडी’ असे करण्यात येणार आहे.
-
हा चित्रपट ठरलेल्या दिवशी, म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश