-
टीव्ही जगतात ज्या कार्यक्रमाची हवा आहे तो कार्यक्रम म्हणजे बिग बॉस, या कार्यक्रमाची सुरवात २००६ साली सोनी वाहिनीवर झाली. पहिल्या सीजनचा सूत्रसंचालक होता आपला सर्किट म्हणजे अर्शद वारसी. ३ नोव्हेंबर २००३ साली या कार्यक्रमाला सुरवात झाली होती.
-
या कार्यक्रमाच्या पहिल्या सीजनच्या यशानंतर दुसरा सीजन सुरु झाला मात्र यावेळी सूत्रसंचालक बदलला, बॉलिवूडची फिट अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सूत्रसंचालन केले होते.
-
शिल्पाने याआधी अनेक चित्रपटात काम केले होते. तिने इंग्रजी ‘बिग ब्रदर’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
-
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून पहिल्यांदाच बच्चनजी सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनीदेखील बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनचे सूत्रसंचालन केले होते.
-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता चित्रपटातून आपल्या स्टाईलने सर्वांना आकर्षित करतो मात्र चौथ्या सीजनमधून तो पहिल्यांदा सूत्रसंचालन करताना दिसून आला. सध्या सुरु असलेल्या सीजनमध्येदेखील तोच आहे.
-
पाचव्या सीजनमध्ये बॉलिवूडचे बाबा आणि भाई एकत्र दिसले अर्थात संजय दत्त, सलमान खा या दोघांनी मिळून या कार्यक्रमात सूत्रसंचालन केले होते.
-
बिग बॉस हल्ला बोल असा एक सीजन होऊन गेला, दिग्दर्शक फराह खानने सूत्रसंचालन केले होते
-
या सीजनला सर्वात कमी टीआरपी मिळाला होता.
-
या सीजननंतर बिग बॉसच्या होस्टची सूत्र सलमान खानकडे आली जी आजतागायत आहेत.
-
सध्या सलमानला डेंग्यूची लागण झाल्याने या आठवड्यात सूत्रसंचालकम्हणून करण जोहर दिसणार आहे.
-
सलमान खानने सूत्रसंचालन करणे आज प्रेक्षकांना आवडत आहे. यातून सलमान खानची वेगळी बाजू बघायला मिळत आहे.
-
वेळोवेळी स्पर्धकांना सुनावणे, एखादा स्पर्धक जर अति आत्मविश्वासू असेल तर सलमान त्याला बरोबर हाताळतो. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”