-
छोट्या पडद्यावरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. तिने अल्पावधीतच कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली.
-
सायलीने हिंदी मालिका आणि चित्रपटात काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटातून महाराणी सईबाई भोसले यांच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने सायली पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
नुकतंच सायलीने ‘बस बाई बस’ या शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात विचारलेल्या सगळ्याच प्रश्नांना तिने अगदी दिलखुलासपणे उत्तरे दिली.
-
या शोमध्ये सायलीने एका दाक्षिणात्य अभिनेत्यावर क्रश असल्याचंही सांगितलं.
-
‘बस बाई बस’मध्ये सहभागी झालेल्या महिलेबरोबर मजेशीर खेळही खेळले जातात.
-
यातील एका खेळात व्यक्तीचा फोटो दाखवून ती व्यक्ती बसमध्ये आपली सहप्रवासी आहे, असं समजून त्याच्याशी गप्पा मारायच्या असतात.
-
सायलीला सहप्रवासी म्हणून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाचा फोटो दाखवण्यात आला. विजयचा फोटो पाहून ती थोडीशी लाजली.
-
नंतर सुबोध भावेकडे पाहून म्हणाली, “मी काहीच बोलणार नाही. विजयचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून प्रवासात झोपून जाईन”. हे ऐकल्यावर कार्यक्रमात हशा पिकला.
-
नंतर ती म्हणाली, “हॅलो विजय, मी असं डोळ्यात बघून तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही. पण मी तुमची खूप मोठी चाहती आहे”.
-
“मी तुमच्यासाठी तेलगुही शिकणार आहे. मला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची खूप इच्छा आहे”, असंही सायली म्हणाली.
-
नंतर ती म्हणाली, “मी सोशल मीडियावर तुम्हाला एक मेसेज पाठवला होता. त्या मेसेजला तुम्ही लाइक पाठवलं होतं. तो दिवस माझ्यासाठी फार छान होता”.
-
पुढे सायली म्हणाली, “मला तुमच्याबरोबर काम करायला खरंच खूप आवडेल. आपण दोघे असा एकत्र पुन्हा प्रवास करू अशी माझी इच्छा आहे”.
-
सायलीने कार्यक्रमात विजय देवरकोंडाला प्रपोजही केलं. “माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. थॅंक यू”, असं ती लाजून म्हणाली.
-
‘हर हर महादेव’ चित्रपटातून सायली पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २५ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
याआधी सायली ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटांतही झळकली होती.
-
(सर्व फोटो : सायली संजीव, झी मराठी/ सोशल मीडिया)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल