-
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं नाव आवर्जून घेतलं जातं.
-
चित्रपट आणि टीव्ही रिअलिटी शोमुळे नेहमीच चर्चेत राहणारी प्राजक्ता माळी आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळेही बरेचदा चर्चेत असते.
-
तिच्या काही पोस्टवरून तिला बरेचदा नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं आहे.
-
प्राजक्ता सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. मात्र तिच्या सध्याच्या पोस्टने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. यासाठी कारणही खूपच खास आहे.
-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं शिवाजी पार्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
-
या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदेेंबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकाच मंचावर दिसून आले.
-
या दीपोत्सवाच्या निमित्ताने प्राजक्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी स्वतः तिला निमंत्रण दिलं होतं.
-
यासंबंधीचे फोटो प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
तिने पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या” शिवाजी पार्क येथील “दीपोत्सवाच्या” निमित्ताने पदरात पडलेले काही खास क्षण…
-
यावेळी तिने दीपोत्सवाचे आमंत्रण दिल्याबद्दल तसेच, केलेल्या पाहूणचारासाठी राज ठाकरे, अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमेय खोपकर यांचे आभार मानले आहेत.
-
यावेळी प्राजक्तासह पांडुरंग कांबळी, संतोष जुवेकर, विशाखा सुभेदार, अशोक सराफ, निवेदिता सराफ, संजय नार्वेकर, वंदना गुप्ते आदी कलाकार उपस्थित होते.
-
कॅप्शनमध्ये ती म्हणाली आहे, “दीपोत्सव बघून इतकी भारावून गेले की फोटो काढायचे विसरले… त्यामुळे नेमके ते फोटोज् नाहीत..असो पण.. ‘किआन’बरोबर फोटो काढला…(त्याला भेटायचच होतं…)”
-
दरम्यान, प्राजक्ताच्या या पोस्टनंतर, ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
-
या दीपोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान राज हे त्यांचा नातू किआनला घेऊन अनेक वेळा दिसले. अगदी उद्घाटनाच्या प्रसंगीसुद्धा ते किआनला कडेवर घेऊन उभे होते.
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही किआनबरोबरचा फोटो शेअर केला आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

स्वारगेट एस टी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार