-
एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतीयांना वेड लावलेच पण त्यानंतर या चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे.
-
एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा समावेश असलेली ‘आरआरआर’ टीम सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपानमध्ये आहे.
-
या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
शुक्रवारी जपानच्या चित्रपटगृहात ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
-
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाला मागे टाकले आहे.
-
याचे कारण म्हणजे, ‘आरआरआर’ हा जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.
-
या चित्रपटाने १८ दशलक्ष येन कमावले आहेत. याची भारतीय किंमत १.०६ कोटी रुपये आहे.
-
याआधी हा विक्रम प्रभासच्या ‘साहो’च्या नावावर होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९० लाखांची कमाई केली होती.
-
पण आता या वीकेंडपर्यंत ‘आरआरआर’ हा चित्रपट जपानी बॉक्स ऑफिसवर ३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय करेल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख