-
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
-
सध्या त्या दोघांच्या घरी लगीनघाई सुरु आहे. त्यांच्या बॅचलर पार्टीचे अनेक व्हिडीओ सध्या समोर येत आहेत.
-
छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
-
याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला.
-
मात्र त्यांची लव्हस्टोरी नेमकी कशी सुरु झाली? कोणी कोणाला प्रपोज केलं? कोणी लग्नासाठी विचारलं? याबद्दल अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
-
नुकतंच यामागील सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. हार्दिक जोशीने ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात याबद्दल स्पष्टपणे भाष्य केले.
-
यावेळी त्याने आमचे लग्न कसे ठरले, लव्हस्टोरी कशी सुरु झाली, साखरपुडा कसा झाला याबद्दल सांगितले.
-
तो म्हणाला, “तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतरच हे सर्व काही जुळलं. आम्ही खूप चांगले मित्र होतो. पाच वर्ष आम्ही एकत्र काम केलं. त्यामुळे एक कुटुंब झालं होतं.”
-
“माझ्या डोक्यात याबद्दल कधीही विचार नव्हता. पण माझी आई सारखी तिला विचारायची, हे मला नंतर कळलं.”
-
“मला तू आवडतेस, अस माझी आईसारखं तिला म्हणायची. त्यावर तुला काय वाटतंय? असं अक्षयाला ती अनेकदा म्हणायची. त्यावर अक्षया हसून सोडून द्यायची.”
-
“त्यानंतर एकदा आई सहज मला म्हणाली की तू आता परत एखादी मालिका करशील, मग चित्रपट करशील. काही दिवस ब्रेक घेशील. तू शूटींगसाठी तीन तीन महिने बाहेर असायचो. आता घरात आहेस, तर लग्नाचा विचार कर.”
-
“तुझं वय निघून चाललं आहे, अस आई सतत म्हणायची. त्यावर मी तिला हो गं बघू असं सांगून सोडून द्यायचो.”
-
“एकदा विचारुन बघ ना. मी तसंही एकदा विचारलं आहे. तू जरा परत विचारुन बघ, असे आई मला म्हणाली.
-
“मी म्हटलं ती माझ्याशी जेवढं बोलते तेवढंही बोलणार नाही. तेही बंद करेल. प्लीझ नको.”
-
“त्यावर आईने हट्ट करुन प्लीझ विचार असे म्हटले आणि मी माझ्या आयुष्यात सर्व गोष्टी आईसाठी करतो.”
-
“त्यावेळी मी विचार केला एकदा विचारुन बघूया.”
-
“मग मी तिला थेट जाऊन विचारले की, बघ तू मला ओळखतेस, मी तुला ओळखतो. माझ्या आईची इच्छा आहे की आपण लग्न करावं. तर तुझं काय मत आहे.”
-
“त्यावर ती म्हणाली, ठिक आहे. फक्त एकदा घरी येऊन बोल; मला काही प्रॉब्लेम नाही.”
-
“मी त्यानंतर तिच्या घरी जाऊन बोललो. तेव्हा लग्नाचा काहीही विचार केला नव्हता. त्यावेळी त्यांना मी सर्व सांगितलं.”
-
“त्यावर त्यांनी ठिक आहे आम्ही विचार करुन सांगतो, असे म्हटलं होतं.”
-
“त्यानंतर थेट सहा महिन्यांनी तारखा सांगितल्या.”
-
“मी माझ्या नव्या मालिकेचे शूटींग करत होतो. त्या सेटवर चालत जात होतो. तेव्हा अचानक मला समोरुन अक्षयाने फोन केला.”
-
“ती म्हणाली तू मेसेज वाचला का? फोटो बघितलास का? असे प्रश्न तिने विचारले. त्यावर मी नाही असं तिला म्हटलं. फोटो बघ आणि फोन कर, असं म्हणत तिने फोन ठेवला.”
-
“त्यावर १, २, ३ आणि २७, २८ अशा तारखा लिहिल्या होत्या. त्या साखरपुड्यासाठी काढलेल्या तारखा होत्या.”
-
“बरं हे सर्व मला २० तारखेला समजलं. पुढच्या दहा दिवसात साखरपुडा करायचा, असं ते सर्व झालं.”
-
“त्यात तिची इच्छा होती की तिच्या वाढदिवसाला साखरपुडा करायचा. तिचा जन्म अक्षय्य तृतीयाचा आहे. म्हणून मग ३ मे रोजी साखरपुडा केला.”
-
‘पण मग जर आईने विचारलं नसतं तर तू विचारलं नसतंस का?’ असा प्रश्न सुबोध भावेने विचारला असता हार्दिकने ‘नाही’ असे उत्तर दिले.
-
“माझ्यात तेवढी हिंमत नाही. माझ्या राणातले तेवढे गुण आहेत”, असे उत्तर हार्दिक जोशीने दिले.
-
दरम्यान हार्दिक जोशी आगामी ‘हर हर महादेव’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.
-
यात तो आबाजी विश्वनाथ ही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य