-
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राने पती निक जोनसबरोबर लॉस एंजेलिसमध्ये दिवाळी साजरी केली.
-
यावेळी निक जोनस आणि प्रियांका यांच्यासह तिची आई मधू चोप्रासुद्धा दिसल्या.
-
प्रियांकाच्या रेस्टॉरंट बाहेरील दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो समोर आले आहेत.
-
या फोटोंमध्ये निक जोनसने सासूबाई मधू चोप्रा यांचा हात पकडलेला दिसत आहे.
-
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये प्रियांका आणि मधू चोप्रा पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहेत.
-
तर निक जोनस ब्लॅक कलरच्या आउटफिट्समध्ये खूपच हॅन्डसम दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये निक आणि मधू चोप्रा यांच्यात खूप चांगलं बॉन्डिंग असल्याचं दिसून येत आहे.
-
निक जोनसला मधू चोप्रा यांचा हात पकडून चालताना पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
-
तर काही फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहे.
-
दरम्यान मुलगी मालतीच्या जन्मानंतर प्रियांका चोप्राची ही पहिलीच दिवाळी आहे.
-
प्रियांका आपल्या देशापासून खूप दूर असली तरी प्रत्येक भारतीय सण साजरा करताना दिसते.
-
प्रियांका चोप्राचा हाच अंदाज तिच्या चाहत्यांची मनं नेहमीच जिंकून घेत असतो. (फोटो साभार- प्रियांका चोप्रा इन्स्टाग्राम, प्रियांका चोप्रा फॅनपेज)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख