-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रिय असलेली अभिनेत्री नयनतारा आणि दिग्दर्शक विग्नेश हे त्यांच्या लग्नापासून खूप चर्चेत आहेत.
-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लेडी सुपरस्टार नयनतारा आणि विग्नेश शिवन यांनी ९ जूनला थाटामाटात लग्न केलं होतं.
-
त्यांच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.
-
लग्नानंतर ४ महिन्यातच दोघंही आई- बाबा झाले.
-
नयनताराचा पती दिग्दर्शक विग्नेश शिवन याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली.
-
लग्नाच्या ४ महिन्यांनंतर नयनतारा आई कशी काय झाली हा प्रश्नही अनेकांना सतावत होता.
-
नयनतारा सरोगसीच्या माध्यमातून आई झाल्याची माहिती समोर आली.
-
त्यांनी आपल्या बाळांची नावं उईर आणि उलगम अशी ठेवली आहेत.
-
आता त्यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर त्यांच्या मुलांची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
दिवाळीच्या शुभेच्छा देताना विग्नेशने त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत विग्नेश, नयनतारा आणि त्यांची दोन्ही मुले दिसत आहेत.
-
यात नयनताराने केशरी रंगाची साडी नेसली असून विग्नेशने लाल रंगाचा कुर्ता आणि लुंगी नेसली आहे. तसेच नयनताराने तिच्या हातात एका मुलाला धरले आहे आणि विग्नेशने त्याच्या हातात दुसऱ्या मुलाला धरले आहे.
-
हा फोटो पोस्ट करताना विग्नेशने लिहिले, “तुम्हा सर्वांना आमच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!”

जिनिलीया वहिनींना पुरणपोळ्या बनवता येतात का? रितेश देशमुखचं उत्तर ऐकताच पिकला हशा; म्हणाला, “घरात मी गुलाम…”