-
अभिनेता गौरव मोरे त्याच्या विनोदी अभिनयशैलीने प्रेक्षकांना पोट धरुन हसायला भाग पाडतो.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमातून अभिनयाची छाप त्याने प्रेक्षकांवर पाडली.
-
याच कार्यक्रमातून गौरव घराघरात पोहोचला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरवचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे.
-
फिल्टरपाड्याचा बच्चन अशी ओळख असलेल्या गौरवने हास्यजत्रेसाठी अनेक ऑडिशन दिल्या होत्या.
-
गौरवच्या अभिनयाप्रमाणेच त्याची स्टाइल आणि विशेष म्हणजे झुपकेदार केस प्रेक्षकांना प्रचंड भावतात.
-
नुकतीच ‘एबीपी वाहिनी’च्या ‘माझा कट्टा’ कार्यक्रमात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ टीमने हजेरी लावली. या मुलाखतीत हास्यजत्रेच्या पडद्यामागचे अनेक किस्से शेअर करण्यात आले.
-
या मुलाखतीत गौरवला त्याच्या झुपकेदार केसांबाबतही प्रश्न विचारण्यात आला. “तू असे केस का वाढवले आहेस?”, असा प्रश्न त्याला विचारला गेला.
-
यावर गौरवने त्याच्या खास शैलीत मजेशीरपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “एक वेळ अशी होती, जेव्हा मला काम मिळत नव्हतं. म्हणून म्हटलं केस वाढवून बघुया”.
-
“या झुपकेदार केसांमुळेच मला गुगलची अॅड मिळाली. तुमचा लूक खूप छान आहे, असं ते म्हणाले. त्यानंतर मला पुढे लूकमुळेच काम मिळत गेलं”, असंही गौरवने सांगितलं.
-
तो पुढे म्हणाला, “प्रसाद खांडेकरबरोबर मी पहिल्यापासूनच काम करत होतो. पण हास्यजत्रेमुळे मला खरी ओळख मिळाली. सोनी मराठी टीम, सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी सर यांच्यामुळे मी मोठा झालो”.
-
“आज मी जो काही आहे तो यांच्यामुळेच आहे. यांना मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. त्यांचा मी खूप मोठा ऋणी आहे”, असंही गौरव म्हणाला.
-
गौरव लवकरच मोठ्या पडद्यावरुन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त तो नुकताच लंडनला जाऊन आला.
-
याआधी तो ‘हवाहवाई’ चित्रपटात झळकला होता.
-
(सर्व फोटो : गौरव मोरे/ इन्स्टाग्राम)

१९ वर्षीय भाचा मामीला घेऊन पळाला, संतापलेल्या मामाने मोठ्या बहिणीला संपवलं