-
सध्या बिग बॉसची सगळीकडेच चर्चा आहे. कोणता स्पर्धक टिकणार, कोण बाहेर पडणार, कोणाला बोलणी खावी लागणार, कोणाचं लफड कानावर पडणार आणि त्या बिग बॉसच्या घरातील अगणित गॉसिप्स आपल्या कानावर पडत असतात. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा कायम असते.
-
सध्याच्या सीझनमध्ये साजिद खानच्या एंट्रीमुळे वातावरण चांगलंच तापलं आणि हा कार्यक्रम आणखी चर्चेत आला.
-
आज आपण याच कार्यक्रमाच्या आजवरच्या सीझनमध्ये सर्वात जास्त मानधन कोणत्या स्पर्धकाला मिळालं आहे त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.
-
करण कुंद्रा हा बिग बॉस १५ मध्ये झळकला. बिग बॉसच्या आजवरच्या इतिहासात सर्वात जास्त मानधन मिळवणारा स्पर्धक म्हणजे करण. करणला या संपूर्ण सीझनसाठी ४.५ कोटी मिळाले होते.
-
क्रिकेटमधल्या फिक्सिंगमुळे क्रिकेटविश्वातून बाहेर पडलेल्या श्रीसांथने चित्रपटाबरोबरच बिग बॉसमध्येदेखील नशीब आजमावलं. १२ व्या सीझनमध्ये श्रीसांथला प्रत्येक आठवड्यामागे ५० लाख इतकं मानधन मिळत होतं.
-
व्रेस्टलिंगविश्वात भारताचं नेतृत्व करणाऱ्या द ग्रेट खलीलाही ५० लाख दर आठवड्याला मिळायचे.
-
सोशल मीडिया आणि टेलिव्हिजनच्या माध्यमातून कायम चर्चेत असणारा करणवीर बोहराला बिग बॉस १२ मध्ये २० लाख दर आठवड्याला मानधन मिळायचे.
-
बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन हिला तर या कार्यक्रमात भाग घ्यायचेच २ कोटी मिळाले होते. रिमी बिग बॉस ९ मध्ये झळकली होती.
-
गेल्याचवर्षी स्वर्गवासी झालेल्या सिद्धार्थ शुक्लानेही बिग बॉस १३ मध्ये ९ लाख प्रत्येक आठवड्याला कमावले होते. आजही त्याचे चाहते त्याला विसरलेले नाहीत.
-
सुरुवातीला बिग बॉस १३ मध्ये सामील होण्यास नकार देणाऱ्या रश्मी देसाईने या सीझनमध्ये येण्यासाठी तब्बल १.२ कोटी एवढी रक्कम घेतली होती.
-
सध्या ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’ या सीरिजमुळे चर्चेत असलेल्या बानी जे हिने बिग बॉस १० च्या पूर्ण सीझनसाठी १.५ कोटी घेतले होते.
-
‘ससुराल सिमरन का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या दीपिका कक्करने बिग बॉस १२ मध्ये हजेरी लावली. तिने आठवड्याला १५ लाख असं मानधन घेतलं होतं.
-
बिग बॉस १० साठी करण मेहराने बरीच घासाघिस केली होती तेव्हा कुठे निर्मात्यांनी त्याला १ कोटी एवढं मानधन दिल्याचं चर्चेत आलं होतं.
-
बिग बॉस ८ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धक म्हणजे करिश्मा तन्ना. तिने या सीझनमध्ये आठवड्याला जवळजवळ १० लाख रुपये कमावले.
-
हिना खानला बिग बॉस ११ साठी आठवड्याला ८ लाख एवढं मानधन मिळालं होतं. या सीझनची हीना ही सर्वात महागडी स्पर्धक होती. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि फेसबुक)

पहलगामचा बदला? भारताने झेलममध्ये पाणी सोडलं? पाकिस्तानात महापूर; आणीबाणी जाहीर