-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर पती निक जोनससह परदेशात स्थायिक झाली आहे.
-
मात्र प्रियांका चोप्रा सर्वच भारतीय सण परदेशातही मोठ्या उत्साहात साजरी करताना दिसते.
-
काही महिन्यांपूर्वीच प्रियाका चोप्रा आणि निक जोनस आई-बाबा झाले आहेत.
-
त्यामुळे यंदाची दिवाळी ही प्रियांका चोप्राची लेक मालतीसह पहिलीच दिवाळी आहे.
-
दरवर्षीप्रमाणे प्रियांकाने यंदाचे तिच्या लॉस एंजेलिसमधील घरी दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.
-
या दिवाळी सेलिब्रेशन आणि लक्ष्मी पूजनाचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनस भारतीय संस्कृतीनुसार पूजापाठ करताना दिसत आहेत.
-
पण यंदा प्रियांकासह या लक्ष्मी पूजनाला तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनसही दिसत आहे.
-
यावेळी प्रियांका चोप्रा पारंपारिक भारतीय पोशाख, कपाळाला टिकली, भांगेत सिंदूर अशा अवतारात दिसली.
-
प्रियांका चोप्राने हे फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या आहे.
-
याशिवाय तिने घरीच जवळच्या मित्रपरिवारासाठी छोटीशी दिवाळी पार्टीही दिली होती.
-
प्रियांकाने लेकीसह फोटो शेअर केले असले तरीही तिचा चेहरा मात्र अद्याप दाखवलेला नाही. (फोटो- प्रियांका चोप्रा, निक जोनस इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख