-
अभिनेता प्रथमेश परबच्या अफेअरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्याने शेअर केलेले फोटो पाहता चाहते त्याला विविध प्रश्न विचारत आहेत.
-
प्रथमेशने साकारलेला दगडू कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिला.
-
चित्रपटामध्ये प्राजूचं म्हणजेच प्राजक्ताचं प्रेम मिळवण्यासाठी प्रथमेशला धडपड करावी लागली.
-
पण आता त्याच्या खऱ्या आयुष्यात मात्र त्याला त्याची रिअल लाईफ प्राजू मिळाली असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
-
त्याने यादरम्यानचे फोटो शेअर करत सगळ्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
-
प्रथमेशने शेअर केलेल्या फोटोंनंतर त्याच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
-
क्षितिजा घोसळकर हिच्याबरोबर प्रथमेशने हे फोटोशूट केलं आहे.
-
क्षितिजाने ‘टाइमपास ३’ चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यालाही हजेरी लावली होती.
-
क्षितीजाबरोबरचे फोटो पाहिल्यानंतर ही वहिनी का? असा प्रश्न अनेकांनी कमेंट्सच्या माध्यमातून प्रथमेशला विचारला आहे.
-
पण आपण क्षितीजाला डेट करत असल्याचं प्रथमेशने उघडपणे अजूनही सांगितलेलं नाही. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं