-
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात.
-
बिग बॉसच्या घरात सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात सुरु आहे.
-
त्यातच आता बिग बॉस मराठीच्या घरात सदस्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी समाजसेविका, गायिका अमृता फडणवीस सहभागी झाल्या आहेत.
-
यावेळी त्यांना राज्यातील राजकारणासह त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले.
-
बिग बॉसच्या घरात सहभागी झालेले किरण माने आणि यशश्री मसूरकर या दोघांनी अमृता फडणवीसांना प्रश्न विचारले.
-
देवेंद्र फडणवीस यांना दिवाळीच्या फराळातील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
-
त्यावर अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांच्या फराळातील आवडत्या पदार्थाबद्दल सांगितले.
-
“देवेंद्र फडणवीस यांना फराळात पोहेतरी खूप आवडते.”
-
“त्या बरोबर त्यांना मोदक आवडतात.”
-
“तसेच त्यांना करंजी खायलाही खूप आवडते”, असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
-
त्या बरोबरच नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत त्यांच्या खाण्याच्या आवडीनिवडीबद्दल भाष्य केले.
-
“मी खादाडच आहे आणि मला सर्वच पदार्थ आवडतात.”
-
“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”
-
“त्यामुळे मी रागावल्यावर मला खायला मिळाले की लगेच राग निवळतो”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
“भूक लागल्यावर मी बेचैन होतो आणि मला राग येतो.”

७ मार्च राशिभविष्य: दुर्गाष्टमीला ‘या’ राशींना धनलाभ तर कोणाला वैवाहिक सुख-शांती जपावी लागणार? तुम्हाला माता लक्ष्मीची अपार कृपा लाभणार का?