-
यंदाच्या दिवाळीत पुण्यातील कलातीर्थ संगीत चित्रकला विद्यालयातर्फे लता मंगेशकर यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली.
फोटो सौजन्य: आश्विन कढाव (एक्सप्रेस ग्रुप) -
या विद्यालयाचे संचालक अमोल अशोक काळे यांच्या संकल्पनेतून भारतरत्न लता मंगेशकर यांचे वस्त्रकोलाज चित्र तयार करण्यात आले.
-
हे तयार करण्यासाठी अमोल काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली.
-
हे कोलाज तयार करण्यासाठी विविध कापडांच्या साधारण ९० हजार तुकड्यांचा वापार करण्यात आला.
-
८ फूट × १० फूट असे भव्य वस्त्रकोलाज चित्र साकारण्यात आले होते.
-
१५ विद्यार्थ्यानी १५ दिवसात हे चित्र साकारले.
-
लता मंगेशकर यांनी त्यांच्या स्वरांच्या धाग्यांनी संपूर्ण जग जोडलं, तर आपणही कापडाच्या धाग्यांनी त्यांचे चित्र तयार करत त्यांना आदरांजली द्यावी, हा यामागचा उद्देश होता.
-
पुण्यातील नारायणपेठ येथील मोदी गणपती मंदिर येथे हे भाव्य वस्त्रकोलाज दिवाळीत रसिकांना पाहता आले. या चित्राच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी काढलेली काही वाद्यांची आणि लता मंगेशकर यांची चित्रं लावण्यात आली होती.
-
या वस्त्रकोलाज चित्राला कालारसिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. हे चित्र पाहणाऱ्या प्रत्येकाने या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले.
फोटो सौजन्य: आश्विन कढाव (एक्सप्रेस ग्रुप)

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का