-
‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते.
-
गेल्या कित्येक वर्षांपासून श्रेयाने तिच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
-
ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
-
नुकतंच श्रेयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे सर्व फोटो यंदाच्या दिवाळी सणाच्या निमित्ताने काढलेले आहेत.
-
या तिने परिधान केलेल्या साड्या, हटके ड्रेस आणि त्याला साजेशी असलेली मिठाई या पद्धतीने तिने कोलाज फोटो शेअर केले आहेत.
-
त्याला तिने हटके कॅप्शन दिले आहे.
-
“यंदा मी खरोखरच दिवाळीची मिठाई खाल्ली नाही… म्हणूनच मी ती बनण्याचे ठरवले”, असे तिने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे.
-
‘यातील तुम्हाला आवडलेला लूक कोणता?’ असा प्रश्नही तिने तिच्या चाहत्यांना विचारला आहे.
-
यावर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
अनेक कलाकारांनी हार्ट, स्माईली, असे इमोजी शेअर करत त्यावर कमेंट केल्या आहेत.
-
दरम्यान श्रेयाच्या या फोटोवर तिच्या एका चाहतीने हटके प्रश्न विचारला आहे.
-
“आम्हाला तुमची कपड्यांची स्टाईल फार आवडते. तुम्ही तुमच्या हटके ड्रेसिंगचे तपशीलही शेअर करु शकता का?” असा प्रश्न तिला एका चाहतीने विचारला आहे.
-
त्यावर श्रेया बुगडेनेही तिला छान उत्तर दिले आहे.
-
‘हे सर्व माझे पर्सनल कलेक्शन आहे’, असे उत्तर श्रेयाने त्या चाहतीच्या प्रश्नावर दिले आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”