-
अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट ९ सप्टेंबरला प्रदर्शित झाला होता.
-
यात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय प्रमुख भूमिकेत आहेत.
-
तर शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला.
-
याशिवाय रणबीर अर्थात शिवाचे आई-वडील म्हणून अमृता आणि देव यांची हलकीशी झलक दिसून आली.
-
तेव्हापासून ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये देवची भूमिका कोण साकारणार यावर बरीच चर्चा रंगताना दिसत आहे.
-
‘ब्रह्मास्त्र : पार्ट 2- देव’ ही कथा असेल असं बोललं जात आहे.
-
रणवीर सिंग देवच्या भूमिकेत तर दीपिका पदुकोण अमृताची भूमिका साकारणार असल्याचीही चर्चा आहे.
-
रणवीर व्यतिरिक्त हृतिक रोशनचेही नाव देवच्या भूमिकेसाठी पुढे येत होते.
-
पण शाहरुख, रणवीर आणि ऋतिकला मागे टाकत एका दक्षिणात्य अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारणा झाल्याचे समोर आलं आहे.
-
दक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे यश. आता त्याची वर्णी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात लागण्याची शक्यता आहे.
-
‘ब्रह्मास्त्र’च्या निर्मात्यांनी यशला ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये ‘देव’ या भूमिकेसाठी विचारणा केली असल्याचे समोर आले आहे.
-
परंतु अद्याप यशने या भूमिकेला होकार दिलेला नाही. जानेवारी २०२३ पर्यंत यश त्याचा निर्णय जाहीर करेल असेही समोर आले आहे.

Mahashivratri 2025 Wishes : “हर हर महादेव!”, प्रियजनांना पाठवा महाशिवरात्रीच्या खास मराठमोळ्या अन् हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर संदेश