-
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच मनोरंजनविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनातही स्वत:चं स्थान निर्माण केलं.
-
‘हायवे’, ‘बॉम्बे टॉकीज’, ‘सरबजीत’, ‘जिस्म २’ या चित्रपटातील त्याचा अभिनय प्रेक्षकांना भावला होता.
-
आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच दिग्दर्शनदेखील करणार असल्याची चर्चा रंगली आहे.
-
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात असतानाच रणदीपने तो प्रेमात असल्याचीही कबुली दिली आहे.
-
‘मेरी कोम’ फेम अभिनेत्री लिन लैशरामबरोबरचा एक फोटो रणदीपने दिवाळीच्या निमित्ताने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
-
रणदीपचा हा फोटो पाहून त्याची गर्लफ्रेंड लिन लैशरामबद्दल चर्चा रंगू लागल्या आहेत.
-
लिन लैशराम मूळची मणिपूरची असून एक प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
-
तिने ‘मेरी कॉम’, ‘रंगून’ आणि ‘उमरिका’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
लिन लैशरामने ‘मिस नॉर्थ ईस्ट’ सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात ती फर्स्ट रनरअप राहिली होती.
-
नॅशनल टेलिव्हिजनवर स्विमसूट परिधान करणारी ती पहिली मणिपुरी मॉडेल आहे. यामुळे ती चर्चेत आली होती.
-
तिरंदाजीतही ती ज्युनियर नॅशनल चॅम्पियन राहिली आहे. याशिवाय ती एक बिझनेसवूमन असून तिचा स्वतःचा दागिन्यांचा व्यवसायही आहे.
-
रणदीप हुडा आणि लिन लैशराम अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसून आले होते. तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
-
ते लिव्ह इनमध्ये राहत असल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या.
-
आता रणदीप हुड्डाने कुटुंबियांसह लिन लैशरामचा फोटो पोस्ट केल्यामुळे ते दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. (सर्व फोटो : इंडियन एक्सप्रेस, लिन लैशराम/ इन्स्टाग्राम)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”