-
यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास ठरली. कारण २५ ऑक्टोबरला (मंगळवारी) दोन बिग बजेट हिंदी तर एक मराठी ऐतिहासिक चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला.
-
अक्षय कुमारचा ‘राम सेतु’, अजय देवगणचा ‘थँक गॉड’ तर सुबोध भावेचा ‘हर हर महादेव’ बॉक्स ऑफिसवर दाखल झाला.
-
‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना हिंदी चित्रपटांकडे मात्र प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
-
अक्षयच्या ‘राम सेतु’ने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उत्तम कामगिरी केली.
-
मात्र आता या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.
-
‘राम सेतु’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली.
-
‘राम सेतु’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ११ कोटी रुपये तर तिसऱ्या दिवशी ८ कोटी २० लाख रुपये कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण ३४ कोटी २० लाख रुपये इतपत कमाई केली आहे.
-
तर ‘थँक गॉड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवशी १४ कोटी १० लाख रुपये कमाई केली.
-
पण तिसऱ्या दिवशी ‘थँक गॉड’चा आकडा पूर्णपणे घसरला. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने फक्त ४ कोटी १४ लाख इतपत कमाई केली.
-
पण ‘हर हर महादेव’ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं या चित्रपटामधील अभिनेता शरद केळकरने पोस्ट शेअर करत म्हटलं होतं.
-
‘हर हर महादेव’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी तब्बल २ कोटी २५ लाख रुपये इतपत कमाई केली. (सर्व फोटो – फाइल फोटो, फेसबुक)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”