-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘काधली’ चित्रपट फेम लोकप्रिय अभिनेता हरिश कल्याण नुकतंच विवाहबंधनात अडकला.
-
हरिश कल्याण याने प्रसिद्ध उद्योजक नर्मदा उदयकुमार हिच्याबरोबर सप्तपदी घेतली.
-
हरिश कल्याण आणि नर्मदा उदयकुमार यांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीने पार पडला.
-
यावेळी हरिश आणि त्याची पत्नी नर्मदा ही यांनी पांढऱ्या रंगाचे पारंपारिक कपडे परिधान केले होते.
-
चेन्नईतील जीपीएन पॅलेस या ठिकाणी हा विवाहसोहळा संपन्न झाला.
-
त्या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
विशेष म्हणजे लग्नाच्या काही दिवस आधी हरिश कल्याणने एक पत्रकार परिषद घेतली होती. यात त्याने त्याच्या लग्नाबद्दलची माहिती दिली होती.
-
“मी नर्मदा उदयकुमार बरोबर लग्नगाठ बांधणार आहे, आमचं अरेंज मॅरेज आहे”, असं त्याने स्पष्ट केले.
-
“आम्ही एकमेकांना पसंत केलं. त्यानंतर एकमेकांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटलो आणि आमचा एकत्र प्रवास सुरू झाला.”
-
“मला अशी जीवनसाथी मिळाली याचा मला फार जास्त आनंद आहे”, असे तो यावेळी म्हणाला होता.
-
अभिनेता हरिश कल्याण हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने आतापर्यंत अनेक तामिळ आणि तेलुगू भाषेतील चित्रपटात काम केले आहे.
-
हरिशने २०१० मध्ये ‘सिंधू समवेली’ चित्रपटातन अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.
-
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘काधली’ चित्रपटातून त्याला खरी ओळख मिळाली.
-
हरिश कल्याण हा लवकरच ‘डिझेल’ चित्रपटात झळकणार आहे.
-
हरिश कल्याणची पत्नी नर्मदा उदयकुमार चेन्नईत राहणारी आहे. ती एक उद्योजिका असून थिसिसर कंपनीची प्रमुख आहे.
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल