-
अतरंगी फॅशन, नग्न फोटोशूट यामुळे चर्चेत आलेला अभिनेता रणवीर सिंग आज बॉलिवूडमध्ये आघाडीचा अभिनेता आहे.
-
‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा हा अभिनेता, त्याने आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
‘पद्मावत’ चित्रपटातून त्याने नकारात्मक भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले होते.
-
बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान आज त्याची ओळख रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो.
-
शाहरुखने आपल्या करियरच्या सुरवातीलाच ‘डर’, ‘बाजीगर’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
-
बॉलिवूडचा बाबा अर्थात संजय दत्त गेली अनेक वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे.
-
संजय दत्तने आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.
-
‘रॉकी’, ‘साजन’ यांसारख्या चित्रपटात त्याने रोमँटिक भूमिका साकारल्या मात्र ‘अग्निपथ’, ‘वास्तव’, ‘केजीएफ’सह अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.
-
बॉलिवूडचा नवाब अर्थात सैफ अली खान हम तुम, परिणीता, सलाम नमस्ते, तारा रम पम यांसारख्या चित्रपटांमध्ये रोमान्स करताना दिसला आहे.
-
‘ओमकारा’, ‘तान्हाजी’ आणि आता ‘आदिपुरुष’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसणार आहे.
-
बॉलिवूडमध्ये सुरवातीला ऍक्शन हिरो म्हणून ओळखला गेलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार . सुरवातीला अक्षयला बरेच अपयश बघावे लागले होते मात्र आता तो बॉलिवूडमध्ये एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळखकला जातो.
-
अशा या अभिनेत्याच्या ‘अजनबी’ आणि ‘खाकी’मधील नकारात्मक पात्रांनी प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”