-
बॉलिवूडप्रमाणे मराठी अभिनेत्रीदेखील कायमच चर्चेत असतात. अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदे गेली अनेकवर्ष मालिका चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहे.
-
सध्या श्वेता शिंदे आपल्या कामातून वेळ काढत सुटी एन्जॉय करताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिने माहिती दिली आहे.
-
श्वेता शिंदे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
-
श्वेता शिंदे सध्या तुर्कस्तानात आहे. इट्स टर्की टाईम असा कॅप्शन देत तिने आपला सेल्फी पोस्ट केला आहे.
-
तुर्कस्तानातील रस्त्यावरचा तसेच एक कॅफेतला फोटो तिने शेअर केला आहे. यात नेहमीपेक्षा वेगळी दिसत आहे.
-
‘सीआयडी’, ‘अवंतिका’, ‘कुमकुम’, अवघाची हा संसार, चार दिवस सासूचे या मालिकांमधून तिने अभिनय केला आहे.
-
श्वेता अभिनयापासून दूर असली तरी निर्मिती क्षेत्रात ती कार्यरत आहे. ‘वज्र प्रोडक्शन’ ही निर्मिती कंपनी तिने २०१६ मध्ये सुरु केली.
-
वज्र प्रोडक्शनद्वारे ‘लागीर झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’, ‘साता जन्माच्या गाठी’ या मालिकांची निर्मिती करण्यात आली आहे.
-
झी मराठी वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही नवीन मालिका श्वेता घेऊन आली आहे.
-
२००७ साली तिने अभिनेता संदीप भन्साळी याच्याशी लग्नगाठ बांधली आहे.
-
या जोडप्याने काही दिवसांपूर्वी झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
-
संदीपने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. संदीप सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर असून त्यांचा कपड्यांचा व्यवसाय आहे. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
![famous actress Parvati Nair got engaged to businessman Aashrith Ashok](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/famous-actress-Parvati-Nair-got-engaged-to-businessman-Aashrith-Ashok.jpg)
प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न