-
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्याना तिच्या आजाराची माहिती दिली आहे.
-
मागच्या काही महिन्यांपासून समांथा गंभीर आजाराशी झुंजत आहे.
-
समांथाने तिच्या सोशल मीडियावर रुग्णालयातील फोटो शेअर करत याची माहिती दिली आहे. समांथाची पोस्ट पाहिल्यानंतर तिचे चाहते हैराण झाले आहेत.
-
समांथाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “‘यशोदा’ ट्रेलरला तुम्ही खूप प्रेम दिलं. हेच प्रेम आणि कनेक्शन मी तुमच्या सर्वांशी शेअर करते. तुमचं सर्वांच प्रेमच मला आयुष्यात येणाऱ्या सर्व संकटांवर मात करण्याचं बळ देतं. काही महिन्यांपूर्वीच मला मायोसायटिस नावाच्या एका ऑटोइम्यून आजाराचं निदान झालं आहे.
-
जाणून घेऊया मायोसायटिस म्हणजे नेमकं काय?
-
या आजारात मांसपेशींना बरीच सूज येते आणि या वाढणाऱ्या सुजेमुळे प्रचंड वेदनासुद्धा होतात. शरीरातील स्नायू या आजरामुळे कमकुवत होतात. यावर योग्य उपचार मिळाला नाही तर या वेदना आणखी वाढतात.
-
सर्वप्रथम मांसपेशींवर हल्ला करणाऱ्या मायोसिटिस या आजाराचा सर्वात जास्त परिणाम खांदे, नितंब आणि मांड्यांभोवतीच्या स्नायूंवर होतो. शिवाय या वेदना शरीरातील इतर भागांमध्येसुद्धा होतात. त्यामुळे श्वास घ्यायला आणि अन्न गिळायला प्रचंड त्रास होतो.
-
डोळ्यांच्या आसपासही चांगलीच सूज येते आणि यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टी करतानासुद्धा प्रचंड त्रास होतो.
-
मायोसायटिसमुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते.
-
मायोसायटिसमुळे शरीरात जेव्हा ऑटोइम्यून स्थिती निर्माण होते, तेव्हा ती शरीरातील चांगले आणि वाईट विषाणू यांच्यात फरक करू शकत नाही आणि त्यामुळेच शरीरातील हेल्दी इम्यून सिस्टमवर हा आजार आघात करतो जे खूप धोकादायक आहे.
-
या आजाराच्या उपचाराविषयी बोलायला गेलं, तर सर्वप्रथम या आजारात रुग्णाला औषधं आणि स्टेरॉईड देऊन हा आजार नियंत्रणात आणला जातो.
-
यामुळेही जर परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर मात्र नियमित व्यायाम, फिजियोथेरेपी, स्पीच थेरेपीच्या सहाय्याने यावर नियंत्रण ठेवता येते.(photo: instagram, file photo)

Pune Swargate Rape Case : “तो माझ्या संपर्कातील मैत्रिणींचे…”, पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीबाबत मैत्रिणीकडून मोठी माहिती; म्हणाली…