-
जितेंद्र जोशी हा मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कलावंत आहे. कसोटीच्या अभिनयाने तो प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडतो.
-
लवकरच तो ‘गोदावरी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात जितेंद्र जोशीने मुख्य भूमिका साकारली असून चित्रपटाची निर्मितीही त्यानेच केली आहे.
-
या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.
-
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट येथे गोदावरी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
-
गोदावरीकाठच्या शहरामध्ये राहणाऱ्या निशिकांत देशमुख आणि त्याच्या कुटुंबाची कथा ‘गोदावरी’मध्ये दाखवण्यात आली आहे.
-
जितेंद्र जोशीसह नीना कुळकर्णी, संजय मोने, गौरी नलावडे, विक्रम गोखले, प्रियदर्शन जाधव, सखी गोखले हे कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल महाजन यांनी केले असून येत्या ११ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
-
आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये स्थान मिळवणाऱ्या या चित्रपटाची भूरळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पडली आहे.
-
“जितेंद्र जोशीचं मी अभिनंदन करतो. प्रदर्शनाआधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचून अनेक पुरस्कार या चित्रपटाने मिळवले आहेत. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मराठी चित्रपटाचा आशय आणि दर्जा नेहमीच जागतिक राहिला आहे. त्याच मांदियाळीतला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
-
पुढे ते म्हणाले, “नदीचे जे नातं आहे ते अत्यंत जुनं आहे. संस्कृती, सभ्यता या सर्व गोष्टींचा थेट संबंध नदीशी राहिलेला आहे. पण दुर्देवाने मधल्या काळात आपण ते महात्म्य विसरलो आणि त्यातून आमच्या नद्या प्रदूषित झाल्या, आमचे विचारही प्रदूषित झाले. आमचे संस्कार आणि जीवनही प्रदूषित झाले”.
-
“यामुळे नदीशी असलेलं नात पुर्नजिवित करता येईल. विशेषत: गोदावरी तर आपली जीवनदायनी आहे. महाराष्ट्रात आपण जवळजवळ ५० टक्के गोदावरी आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहोत. त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी व्यक्ती स्वत:चं जीवन या चित्रपटाशी रिलेट करेल”, असंही ते म्हणाले
-
“मी खरंच मनापासून शुभेच्छा देतो. तसेच या निमित्ताने मी स्वत:लाही आठवण करुन देतो. आपल्या सर्वांवर आपल्या नद्या जपण्याची जबाबदारी आहे”, असं म्हणत त्यांनी गोदावरी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.
-
तसेच हा चित्रपट निश्चित पाहणार असल्याचंदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
-
(सर्व फोटो : जितेंद्र जोशी, जिओ स्टुडीओ मराठी/ इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO