-
केदार शिंदे यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट खूप चर्चेत आहे.
-
या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता आहे.
-
५ ऑक्टोबर रोजी या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा पार पडला.
-
वाई, पसरणी येथे म्हणजेच शाहीर साबळेंच्या जन्मस्थळी हा ‘महाराष्ट्र शाहीर’ च्या चित्रीकरणाचा मुहूर्त सोहळा संपन्न झाला.
-
यावेळी या चित्रपटाच्या निर्मात्या बेला शिंदे यांनी कलश पूजन करत शाहीर साबळे यांच्या फोटोलाही वंदन केले.
-
या चित्रपटाची संपूर्ण टीम या मुहूर्त सोहळ्याला उपस्थित होती.
-
अभिनेता अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे.
-
तर केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे या चित्रपटामध्ये शाहिरांच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसेल.
-
चित्रपटाचा मुहूर्त संपन्न होताच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मुंबई, पुणे, सातारा, वाई, भोर येथे सुरुवात झाली आहे. पुढच्या वर्षी २८ एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?