-
आज ऐश्वर्या राय-बच्चनचा ४९ वा वाढदिवस आहे. जगभरातल्या चाहत्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तिने मॉडेलिंग करुन करिअरची सुरुवात केली होती. ‘इरुवर’ चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीमध्ये पदार्पण केले होते.
-
‘और प्यार हो गया’ या चित्रपटाने तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पण ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळाली.
-
संजय लीला भन्साळी यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
-
काही दिवसांपूर्वी तिचा ‘पोन्नियिन सेल्वन भाग १’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तिने नंदिनी ही व्यक्तिरेखा साकारली होती.
-
गेल्या काही वर्षांपासून ती सिनेसृष्टीपासून लांब होती.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या ७७५ कोटी रुपयांची मालकिण आहे.
-
चित्रपट, सीरिज न करताही तिची इतकी संपत्ती कशी असा प्रश्न पडू शकतो.
-
एका चित्रपटासाठी ती १० ते १२ कोटी रुपयांचे मानधन घेते. ब्रँड इंडोर्समेंट्सद्वारे ऐश्वर्या वर्षाला तब्बल ८०-९० कोटी रुपये कमावते.
-
जाहिरातींमध्ये काम करण्याचे ती ७-८ कोटी रुपये इतके मानधन आकारते. ऐश्वर्या ‘अॅम्बी’ नावाच्या कंपनीत गुंतवणूकदार आहे.
-
२००७ मध्ये तिने अभिषेक बच्चनशी लग्न केले. त्यांच्या मुलीचे नाव आराध्या आहे.
-
अभिषेक आणि ऐश्वर्या यांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणची प्रॉपर्टी विकत घेतली आहे.
-
दुबईच्या ‘जुमेराह गोल्फ एस्टेट्स’मध्ये त्यांचा मोठा बंगला देखील आहे.
-
बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा २१ कोटी रुपयांचा फ्लॉट आहे.
-
तिच्या मालकीच्या रोल्स रॉयल्स घोस्ट, मर्सिडीज बेंज एस 350 डी कूप अशा महागड्या गाड्या प्रतिक्षा या बंगल्यामध्ये आहेत.
![Sun transit in dhanishta nakshtra](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2024-06-08T201503.979.jpg?w=300&h=200&crop=1)
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा