-
बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिच्या अभिनयाबरोबर तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
-
ती नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते.
-
आज १ नोव्हेंबर. ऐश्वर्या राय बच्चन आज तिचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनशी लग्न करण्याआधी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण लग्नानंतर तिने फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं.
-
विश्व सुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे.
-
ऐश्वर्या आणि अभिषेक सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
-
या दोघांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली असली तरी त्याच्यातील प्रेम अद्याप कायम आहे.
-
या दोघांना अनेकजण आदर्श कपल समजतात.
-
ऐश्वर्या ही अभिषेक बच्चनपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. मात्र त्या दोघांमध्ये कधीही यावरुन वाद झालेले पाहायला मिळाले नाहीत.
-
ऐश्वर्या रायच्या सौंदर्याला पाहून अभिषेकने तिच्याशी लग्न केले, अशी टीका अनेकदा केली जाते.
-
मात्र एका मुलाखतीत अभिषेक बच्चनने या टीकांवर सडेतोडपणे उत्तर दिले होते.
-
“मी तिच्या सौंदर्यामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे तिच्याशी लग्न केले”, असे यावेळी म्हणाला होता.
-
“ऐश्वर्या ही खूप सुंदर आहे. ती व्यक्ती म्हणूनही फार चांगली आहे.”
-
“तिचे मन फार स्वच्छ आहे आणि हेच तिचे खरे सौंदर्य आहे.”
-
“याच कारणामुळे मी तिच्याशी लग्न केले आणि तिला जीवनसाथी म्हणून निवडले.”
-
“एखाद्या व्यक्तीचे सौंदर्य हे ठराविक काळापर्यंत टिकते.”
-
“पण निर्मळ आणि स्वच्छ मन असलेल्या व्यक्तीचे सौंदर्य जास्त काळ असते.”
-
“त्यामुळेच तुम्ही तुमच्या बाह्य सौंदर्यावर प्रेम करु नका, त्याऐवजी मनाच्या सुंदरतेवर प्रेम करा.”
-
“तुमचा जोडीदार हा फक्त सुंदर हवा असे जर तुम्ही म्हणत असाल तर ही तुमची खूप मोठी चूक ठरु शकते.”
-
“कारण तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर संपूर्ण आयुष्य घालावायचे आहे.”
-
“त्यामुळे बाह्य सौंदर्यापेक्षा मनाने सुंदर असणे गरजेचे आहे.” असे अभिषेक बच्चनने म्हटले होते.

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल