-
मराठी मनोरंजन विश्वात अशोक सराफ यांचं केवढं योगदान आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. चित्रपट, टेलिव्हिजन, नाटक अशा तीनही क्षेत्रात आजही त्यांचं नाव अदबीने घेतलं जातं. अशोक सराफ यांचं चित्रपटापेक्षा सर्वात जास्त प्रेम हे नाटकावर आहे हे पदोपदी सिद्ध झालं आहे.
-
सध्या त्यांचं आणि निर्मिती सावंत यांचं ‘व्हॅक्युम क्लिनर’ हे नाटक चांगलंच गाजतंय.
-
मध्यंतरी या नाटकाचे २०० प्रयोगदेखील पूर्ण झाले.
-
प्रेक्षकही या नाटकाला उदंड प्रतिसाद देत आहे आणि प्रत्येकाला हे नाटक अगदी आपलंसं वाटतंय.
-
मध्यंतरी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेदेखील हे नाटक पाहून त्यांच्या संपूर्ण टीमबरोबर फोटो शेअर केले होते.
-
सोनालीने या नाटकाचं तोंडभरून कौतुकही केलं.
-
शिवाय निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांच्याबरोबर फोटोजही शेअर केले.
-
२०१९ मध्ये या नाटकाच्या कमाईमधील काही रक्कम अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांच्या हस्ते पूरग्रस्त लोकांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली होती.
-
या नाटकात अशोक सराफ, निर्मिती सावंत, तन्वी पालव, मौसमी तोंडवळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.
-
नुकतंच ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे नाटक पाहिलं आणि त्याबद्दल त्यांनी मनोगत सोशल मिडियाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे.
-
राज यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये काही फोटोज शेअर केले आणि ते पुढे लिहितात की, “व्हॅक्युम क्लिनरच्या ‘धक्क्याने’ नात्यांमध्ये निर्माण झालेले ताण दूर होतात हे पाहताना मजा आलीच. पण वयाची ७५ पूर्ण केलेल्या अशोक सराफ ह्यांची ऊर्जा आणि रंगमंचावरचा वावर पाहून थक्क व्हायला झालं. निर्मिती सावंत यांचा बहारदार अभिनय आणि संचातील इतर सगळ्याच कलाकारांचा अभिनय मस्त होता.”
-
नाटक पाहिल्यानंतर नाटकातील कलाकारांची, तंत्रज्ञांची, दिग्दर्शकाची भेट घेऊन राज ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छादेखील दिल्या. (फोटो सौजन्य : फेसबुक)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…