-
बॉलिवूडमध्ये अभिनेते, अभिनेत्रींची प्रेमप्रकरणं नवी नाहीत. मात्र हीच प्रेमप्रकरणं नेहमी यशस्वी होतात असे नाही.
-
‘ओम शांती ओम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण.
-
दीपिका आणि रणबीर कपूरच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चांगलीच रंगली होती, ब्रेकअपनंतरदेखील दोघांनी ‘ये जवानी दिवानी’, ‘तमाशा’ या चित्रपटात एकत्र काम केले.
-
शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूर जिने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
श्रद्धा आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. ‘आशिकी’ चित्रपटादरम्यान तिच्या आदित्य रॉय कपूरबरोबर प्रेम प्रकरणाची जोरदार चर्चा झाली होती.
-
दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्याही येत असताना दोघांनी ‘ओके जानू’ चित्रपटात काम केले.
-
बॉलिवूडची कॅट अर्थात कतरीना कैफ सध्या चर्चेत आहे तिचा ‘फोन भूत’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
तिने आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंग क्षेत्रापासून केली आहे. मात्र बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले स्थान निर्माण केले आहे.
-
दीपिकाच्या बरोबरीने तिचे सुद्धा रणबीर कपूरबरोबर प्रेमप्रकरण गाजले होते. ब्रेकअपनंतरही दोघांनी ‘जग्गा जासूस’मध्ये एकत्र काम केले होते.
-
करीना कपूर खान नुकतीच ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पडला.
-
‘टशन’ चित्रपटाच्या दरम्यान तिचे सैफ अली खानबरोबर प्रेम जमले आणि दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर २०१२ साली लग्न केले.
-
करीनाचे शाहिद कपूर बरोबर प्रेमप्रकरण होते मात्र हे नाते टिकले नाही. ब्रेकअपनंतर दोघांनी ‘उडता पंजाब’मध्ये एकत्र काम केले. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य