-
कांतारा या हिट चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. सुट्टीच नव्हे तर सोमवारीही कांताराच्या शो ला गर्दी होत आहे.
-
कांताराचा लेखक दिग्दर्शक व मुख्य अभिनेता रिषभ शेट्टी याच्या कामाचे सगळीकडे कौतुक होत आहे.
-
ऍक्शन, हॉररचा संगम असलेल्या कांतारामध्ये शिवा व लीला या दोघांच्या प्रेमाने हळवी बाजूही दिसून आली.
-
रिषभ शेट्टीसमोर लीला हे पात्र साकारणारी सप्तमी गौडा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सप्तमी गौडाचा हा दुसराच चित्रपट असला तरी तिच्या अभिनयाने व सौंदर्याने तिने सर्वांची मने जिंकली आहेत.
-
तुम्हाला माहित आहे का सप्तमीला अभिनयच नव्हे तर तिच्या एका अन्य टॅलेंटमुळेही राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले आहेत.
-
कांतारा फेम सप्तमी गौडा ही राष्ट्रीय स्तरावर अनेक पदक मिळवलेली निष्णात जलतरणपटू आहे.
-
५ वर्षाची असल्यापासून सप्तमीने स्विमिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. यासाठी सप्तमीचे वडील एस. के. उमेश यांनी तिला प्रोत्साहन दिले होते.
-
सप्तमीला ९ वर्षाची असताना राज्यस्तरीय स्विमिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक मिळाले होते. २००९ मध्ये सप्तमीला राष्ट्रीय स्तरावर ट्रायथलॉन मध्ये सुवर्ण पदक मिळाले होते.
-
सप्तमीला जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सहभागी होण्याची संधी होती मात्र वय कमी असल्याने ती पात्र ठरली नाही.
-
सप्तमीने सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. सप्तमीला UPSC परीक्षा देण्याचीही इच्छा होती.
-
सप्तमीने यापूर्वी २०२० मध्ये पॉपकॉर्न मंकी टायगरमध्ये या पहिल्या वहिल्या चित्रपटात अभिनयासाठी वाहवा मिळवली होती.

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल