-
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा केवळ भारतातच नाही जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.
-
आजही अमिताभ बच्चन यांचा अभिनय आणि उत्साह नव्या कलाकारांना लाजवणारा असाच असतो.
-
त्यांना भेटण्यासाठी त्यांचे चाहते दर रविवारी त्यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर गर्दी करतात.
-
विशेष म्हणजे बिग बीसुद्धा आपल्या चाहत्यांना तेवढ्याच उत्साहाने आणि आपुलकीने भेटतात.
-
चाहत्यांचं त्यांना पाहण्यासाठी गर्दी करणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असल्याचंही ते सांगतात.
-
अमिताभ बच्चन जेव्हाही त्यांच्या चाहत्यांना भेटण्यासाठी येतात तेव्हा त्यांना भेटण्याआधी ते नेहमीच चप्पल काढतात. याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी नुकतंच त्यांच्या एका ब्लॉगमध्ये ‘जलसा’बाहेर जमणाऱ्या चाहत्यांमध्ये आता घट होत असल्याचं म्हटलं आहे.
-
अमिताभ बच्चन यांच्या मते आता चाहत्यांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्यासाठी पूर्वीसारखा रोमांच आणि उत्साह राहिलेला नाही.
-
बिग बींनी आपल्या याच ब्लॉगमध्ये चाहत्यांना भेटण्याआधी ते नेहमी चप्पल का काढून ठेवतात याचं कारणही स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलेलं हे कारण खूपच खास आहे.
-
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या लेटेस्ट ब्लॉगमध्ये चाहत्यांच्या भेटीचे काही फोटो शेअर करताना चाहत्यांना भेटण्याआधी चप्पल काढणं म्हणजे चाहत्यांप्रती आपली भक्ती असल्याचं म्हटलं आहे.
-
त्यांनी लिहिलं, “माझ्या हितचिंतक आणि चाहत्यांना भेटण्याआधी मी शूज किंवा चप्पल काढतो… ही माझ्यासाठी त्यांच्याप्रती असलेली भक्ती आहे.”
-
आपल्या ब्लॉगमध्ये ते पुढे लिहितात, “माझ्या लक्षात आलंय की आता चाहत्यांच्या संख्येत घट झाली आहे. उत्साह कमी झाला आहे.”
-
आमिताभ यांनी पुढे लिहिलं, “लोकांचा आनंदाने ओरडण्याच्या आवाजाची जागा आता कॅमेराने घेतली आहे. हे सगळं सांगतं की आता वेळ बदलली आहे आणि कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही.”
-
दरम्यान अमिताभ बच्चन ८० च्या दशकापासून अनेक वर्ष ‘जलसा’बाहेर चाहत्यांना भेटतात.
-
आपल्या चाहत्यांना हात हलवून अभिवादन करतात. त्यांच्या या भेटीला काही चाहत्यांनी ‘दर्शन’ असं नावही दिलं आहे. (फोटो साभार- srbachchan/tumblr, अमिताभ बच्चन इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख