-
प्रियांका चोप्रा तीन वर्षांनंतर भारतामध्ये परतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही माहिती चाहत्यांना दिली होती.
-
काल मुंबईमधल्या एका कार्यक्रमाला तिने हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि लूज पॅन्ट असा सुपर स्टायलिश लुक केला होता.
-
प्रियांकाचे या कार्यक्रमातले फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.
-
एका हेअरकेअर ब्रॅन्डच्या लॉन्च इव्हेंटमध्ये ती प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित राहिली होती.
-
या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ती मरीन ड्राईव्हला फिरायला गेली होती.
-
तेव्हाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावरवर पोस्ट केला आहे.
-
ती बॉलिवूडमध्ये पुन्हा कमबॅक करण्यासाठी भारतात परतली आहे असे म्हटले जात आहे.
-
प्रियांका यावेळी तिच्या लेकीला भारतामध्ये आणणार आहे अशी शक्यता वर्तवली जात होती. (सर्व फोटो – वरिंदर चावला)
पुणेकरांचा नादखुळा! भारताच्या दणदणीत विजयानंतर पुण्यात FC रोडवर हजारो क्रिकेट फॅन्सनी काय केलं पाहा; VIDEO झाला व्हायरल