-
बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकत कन्नड चित्रपट ‘कांतारा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
-
हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे.
-
या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शन, अभिनय अशा तिन्ही गोष्टी रिषभ शेट्टीने सांभाळल्या आहेत.
-
नुकताच तो मुंबईमधील पीव्हीआर चित्रपटगृहात उपस्थित राहिला होता.
-
पीव्हीआर चित्रपटगृहातील कर्मचाऱ्यांनी त्याचे स्वागत केले याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
रिषभचे चाहते, पत्रकार यांनी चित्रपटगृहात गर्दी केली होती.
-
यावेळी त्याचे अनेक चाहते, माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते. त्याने माध्यमांशी संवाद साधला.
-
चाहत्यांनी त्याच्याबरोबर फोटोदेखील काढले आहेत.
-
आतापर्यंत या चित्रपटाने जगभरात २४३ कोटी रुपये कमाई केली आहे. चित्रपट समीक्षकांसह कलाक्षेत्रामधील अनेक दिग्गज मंडळींनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
-
रिषभने आपल्या करियरची सुरवात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली आहे.
-
रिषभने काही काळ बॉलिवूडमध्ये छोटी मोठी काम केली आहेत मात्र त्याला यश मिळाले नाही.
-
रिषभने नुकतीच सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेतली होती. त्यांनीदेखील चित्रपटाचे कौतुक केले आहे. फोटो सौजन्य : पीव्हीआर,होमबळे फिल्म्स इन्स्टाग्राम

बापरे! भरधाव ट्रकमधला पत्रा उडाला; तरुणाचं डोकं एकीकडे अन् शरीर एकीकडे, अपघाताचा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO समोर