-
बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार, गेली अनेकवर्ष तो बॉलिवूडमध्ये कार्यरत आहे.
-
वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘पृथ्वीराज’ चित्रपटानंतर तो आपल्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे.
-
महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या नव्या ऐतिहासिक चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
-
अक्षयच्या आधी बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानने मराठी चित्रपटात काम केले आहे.
-
सलमान ‘लई भारी’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.
-
बॉलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ‘अक्का’ आणि ‘ABCD’ या मराठी चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.
-
मराठमोळ्या रितेश देशमुखने आपल्या अभिनयातून बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
-
२०१४ साली त्याने निशिकांत कामत दिग्दर्शित ‘लई भारी’ चित्रपटातून मराठीत पदार्पण केले आहे.
-
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने आजवर अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे.
-
माधुरीचे चाहते मराठी चित्रपट कधी करतेय याची वाट बघत होते. अखेर तिने २०१८ साली ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.
-
अभिनेता जॅकी श्रॉफ उत्तम मराठी बोलतात त्यांनीदेखील ‘हृदयना’थ या मराठी चित्रपटात काम केले आहे.
-
८० च्या दशकात मराठमोळ्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. त्यांनीदेखील ‘चिमणी पाखरं’, ‘प्रवास’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं