-
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे.
-
या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
या चित्रपटात ७ प्रसिद्ध मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.
-
पण या सगळ्यात सत्य मांजरेकरच्या नावाच्या सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
सत्य मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये दत्ताजी पागे ही भूमिका साकारत आहे.
-
मात्र या ऐतिहासिक भूमिकेत दिसणारा सत्य मांजरेकर नेमका कोण याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.
-
सत्य मांजरेकर हा दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे.
-
सत्यने याआधी ‘फन अनलिमिटेड’ आणि ‘१९६२ द वॉर इन द हिल्स’मध्ये काम केलं आहे.
-
सत्यचा सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो आणि त्याचा बराच मोठा चाहता वर्ग आहे.
-
आता त्याचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मधील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. (फोटो साभार- सत्य मांजरेकर इन्स्टाग्राम)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं