-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
-
या मालिकेमधील विनोदी कलाकारांचे तर लाखोंच्या घरात चाहते आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री विशाखा सुभेदारने या कार्यक्रमामधून एक्झिट घेतली.
-
काही तरी नवं करण्याच्या हेतून तिने या कार्यक्रमामधून ब्रेक घेतला.
-
आता विशाखा पाठोपाठ आणखी दोन अभिनेत्यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम सोडला आहे.
-
एकाचवेळी दोन कलाकार कार्यक्रमामधून बाहेर पडण्यामागचं कारणही समोर आलं आहे.
-
ओंकार भोजने व पंढरीनाथ कांबळे यांनीही या कार्यक्रमातून एक्झिट घेतली आहे.
-
झी मराठी वाहिनीवर ‘फू बाई फू’ हा विनोदी कार्यक्रम सुरु होत आहे.
-
या कार्यक्रमामध्ये ओंकार व पंढरीनाथ दिसणार आहे.
-
‘फू बाई फू’च्या नव्या प्रोमोमध्ये या दोघांची झलक पाहायला मिळाली.
-
पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये आम्ही तुला मिस करणार असं प्रेक्षक ओंकारला सतत म्हणत आहेत. (सर्व फोटो – फेसबुक)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…