-
आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे तब्बू. आज ४ नोव्हेंबर रोजी तब्बूचा वाढदिवस आहे.
-
तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यातील बहुतांश चित्रपट सुपरहिट ठरले आहेत.
-
या चित्रपटांनी बॉक्स ऑफिससोबतच चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच जादू केली आहे.
-
सिनेसृष्टीतील करिअरसह तब्बू तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत होती.
-
वयाची ५० ओलांडूनही तब्बू अद्याप अविवाहित आहे. तिने लग्न का केले नाही? याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केला जातो.
-
सिनेसृष्टीत एकेकाळी तब्बूच्या अफेअरच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या.
-
दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन अक्कीनेनी याच्याबरोबर तब्बूचे अफेअर होतं असेही म्हटलं जातं.
-
नागार्जुन आणि तब्बू बराच काळ एकमेकांना डेट करत होते, अशाही चर्चा रंगल्या होत्या.
-
मात्र काही महिन्यांपूर्वी तब्बूने या सर्व चर्चांवर मौन सोडले.
-
तब्बूने करण जोहरचा टॉक शो कॉफी विद करणमध्ये हजेरी लावली होती.
-
यावेळी करणने तिला बॉयफ्रेंडसह खासगी आयुष्याबद्दल विविध गोष्टींवर प्रश्न विचारले.
-
‘तुमच्या बॉयफ्रेंडबद्दल मीडियामध्ये फार उत्सुकता आहे. त्याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे आहे?’ असे करणने तब्बूला विचारले होते
-
त्यावर उत्तर देताना तब्बू म्हणाली, “माझे अनेक बॉयफ्रेंड होते. पण नागार्जुन मात्र कायम राहिला.”
-
“नागार्जुनची कथा खूप जुनी आहे. अनेकदा लोक मला त्याबद्दल विचारत असतात.”
-
“नागार्जुन हा माझ्या आयुष्यातील अशा काही मोजक्या लोकांपैकी आहे जे माझ्या फार जवळ आहेत.”
-
“नागार्जुनबरोबरच्या नात्यामुळे माझ्यावर दडपण किंवा ताण येत नाही.”
-
“पण त्याच्या आणि नात्याबद्दल अनेक लोक मला विचारत असतात.”
-
“पण मी त्या नात्याला काहीही नाव दिलेले नाही आणि ते देऊही इच्छित नाही”, असे तब्बू म्हणाली.
-
दरम्यान नागार्जुन आणि तब्बूची एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ओळख झाली होती. त्या दरम्यान दोघे ही ऐकमेकांच्या प्रेमात पडले.
-
नागार्जुन आणि तब्बूचे रिलेशनशीप जवळजवळ १० वर्षे सुरु असल्याचे म्हटले जातं.
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख