-
छोट्या पडद्यावर उत्तमोत्तम भूमिका साकारत उर्वशी ढोलकियाने कलाक्षेत्रात स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं.
-
उर्वशी तिच्या नकारात्मक भूमिकांमुळे अधिक चर्चेत आली.
-
वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही ती अगदी सुंदर दिसते.
-
नुकतंच तिने केलेलं बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
-
तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये उर्वशी खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे.
-
या फोटोंमध्येच तिचे स्ट्रेच मार्क्सही दिसत आहेत. फोटो शेअर करताना तिने खास पोस्टही लिहिली.
-
ती म्हणाली, “महिला कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करतात, कशा दिसतात किंवा कशा वागतात याबाबत त्यांना नेहमीच जज केलं जातं.
-
“एक महिला म्हणून मी जशी आहे, मला कोणते कपडे परिधान करायचे आहेत याचा सर्वस्वी निर्णय हा माझा आहे.”
-
“मला माझं जीवन जगण्याचा अधिकार आहे. माझा सन्मान व स्वाभिमान मी स्वतः कमावला आहे. आपलं शरीर नेहमी बदलत असतं.”
-
“शरीराच्या आकारानुसार तसेच शरीरयष्टीवरून आम्हाला बोलायची गरज नाही. स्त्री ती असते जिच्यापासून एक नवं आयुष्य सुरु होतं. ही खरी संपत्ती माझ्या जवळ आहे. यामुळे मी खूप खुश आहे.”
-
(सर्व फोटो – इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख