-
भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे.
-
किक्रेटमधील करिअरप्रमाणे त्याचे खासगी आयुष्य देखील नेहमी चर्चेत असते.
-
त्याने २०१७ मध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न केले.
-
जानेवारी २०२१ मध्ये त्यांच्या मुलीचा वामिकाचा जन्म झाला.
-
‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी अनुष्का अभिनयासह निर्मिती क्षेत्रामध्येही कार्यरत आहे.
-
तिचा ‘चकडा एक्सप्रेस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट झुलन गोस्वामी यांच्यावर आधारलेला आहे.
-
या चित्रपटामधील प्रमुख भूमिका साकारण्यासाठी तिला क्रिकेट शिकावे लागले. यामध्ये विराटने तिला खूप मदत केली.
-
२०१३ मध्ये विराट-अनुष्का यांनी एका शॅम्पू कंपनीच्या जाहिरातीमध्ये एकत्र काम केले होते. तेव्हा त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.
-
या भेटीनंतर त्या दोघांची ओळख वाढली. पुढे त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती.
-
हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले होते.
-
काही काळ ते लपूनछपून एकमेकांना डेट करत होते.
-
या काळामध्ये विराटच्या आयुष्यातला सर्वात चांगला काळ सुरु होता. क्रिकेटविश्वामध्ये तो शिखरावर होता.
-
तेव्हा त्याने अनुष्काला लग्नाची मागणी घातली होती. पण करिअरवर लक्ष देण्याचे कारण देत तिने हा प्रस्ताव नाकारला होता.
-
यामुळे त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यांनी बोलणं देखील बंद झाले होते.
-
दरम्यान ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे त्या दोघांच्याही लक्षात आल्याने ते पुन्हा एकत्र आले.
-
एका मुलाखतीमध्ये विराटने त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला.
-
तो म्हणाला, “त्या सेटवर मी बसलो होतो. थोड्या वेळाने अनुष्का सेटवर पोहोचली.”
-
“तिने हिल्स घातल्या होत्या. तिच्याकडे पाहिल्यानंतर ती माझ्यापेक्षा उंच आहे हा विचार माझ्या डोक्यात आला.”
-
“त्याच विचारात असताना मी तिला गमतीमध्ये ‘तुझ्याकडे आणखी उंच हिल्स नव्हत्या का?’ असे विचारले.”
-
“हे ऐकून ती ‘काय म्हणालास..?’ असं थोडं चिडत म्हणाली. तेव्हा मी ‘मस्करी करत होतो’, असे तिला सांगितला.”
-
“मी तिच्यासमोर हसत होतो, पण माझ्या मनामध्ये ‘मी हे काय बोलून गेलो’ असा विचार सुरु होता. खरं सांगायचं तर, त्यावेळी मी तेव्हा वेड्यासारखा वागलो होतो.”
(हेही पाहा >> Photos: …म्हणून दुबईत असतानाच विराट झाला ‘अलिबागकर’; जाणून घ्या नेमकं काय घडलं)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”