-
‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधली राणादा व पाठक बाई या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं.
-
हार्दिक जोशी व अक्षया देवधर ही ऑनस्क्रिन जोडी आता लवकरत विवाहबंधनात अडकणार आहे.
-
हार्दिक त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र असला तरी अक्षयासह तो लग्नाची जोरदार तयारी करत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच अक्षया-हार्दिकच्या केळवणाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
-
इतकंच नव्हे तर दोघंही सध्या आपलं लग्न कसं छान पार पडेल? याकडे अधिकाधिक लक्ष देत आहेत.
-
आता त्यांनी आपल्या लग्नाचं आमंत्रण जवळच्या मित्र-मंडळींना देण्यासही सुरुवात केली आहे. म्हणजेच कलाक्षेत्रातील मंडळी त्यांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
-
अभिनेत्री ऋचा आपटेला अक्षया-हार्दिकने लग्नाची पत्रिका दिली.
-
ऋचाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटो शेअर केला आहे.
-
अक्षया-हार्दिकची लग्नपत्रिका फारच सुंदर आहे.
-
या लग्नपत्रिकेवर चंदेरी रंगाचं पान आणि सुपारी दिसत आहे.
-
अक्षया-हार्दिकचा लग्न सोहळा कधी पार पडणार? याबाबत सध्यातरी दोघांनीही न बोलणंच पसंत केलं आहे. (सर्व फोटो – फेसबुक)

‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात खूप उशीरा मिळतो पैसा, धन-संपत्ती; वयानुसार सुधारते आर्थिक परिस्थिती