-
छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिले जाते. सध्या या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.
-
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये अनेक राडे, भांडण, सतत होणारे वाद पाहायला मिळत आहे.
-
बिग बॉसच्या घरातून निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे आणि योगेश जाधव हे तिघेजण आतापर्यंत घराबाहेर पडले आहेत.
-
बिग बॉसच्या घरातील जेंटल जाईंट अशी ओळख असणाऱ्या योगेश जाधववर मेघा घाडगेने अनेक आरोप केले होते.
-
“योगेशचा पहिल्या दिवसापासून त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. मी त्याला वेळोवेळी सावध केलं आहे. तू जे बोलतोस ते सगळंच मी ऐकून घेऊ शकत नाही. तू थोडं तोंड साभाळून बोलत जा, असे मेघा घाडगेने म्हटले होते.
-
योगेश जाधवने मेघा घाडगेचे हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. “मी असं काहीही बोललेलो नाही. हा एक मोठा गैरसमज होता. मी एक दोन दिवसात तिला भेटेन असेही योगेशने यावेळी म्हटले होते.
-
बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच मेघा घाडगे आणि योगेश जाधव यांची एकमेकांशी भेट झाली आहे.
-
त्यांच्या या भेटीचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.
-
मेघा घाडगेने स्वत: हे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत ते दोघेही केक कापताना, एकमेकांशी बोलताना, खळखळून हसताना दिसत आहेत.
-
तिने या फोटोला कॅप्शन देताना ‘हे सत्य आहे’, असे म्हटले आहे.
-
त्यांच्या या फोटोंमुळे त्यांच्यातील रुसवे-फुगवे मिटल्याचे पाहायला मिळत आहे.

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल