-
केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच नव्हे तर संपूर्ण भारतातील मनोरंजनक्षेत्रावर राज्य करणारे कमल हासन हे आज त्याच्या ६८ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
-
साऊथचे सुपरस्टार असूनही कमल यांचा हिंदी चित्रपटसृष्टीतही चांगलाच दबदबा आहे.
-
केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर कमल एक उत्तम दिग्दर्शक, लेखक, निर्माता आणि पार्श्वगायक म्हणूनही ओळखले जातात.
-
याचवर्षी कमल हासन यांचा ‘विक्रम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांनी तो प्रचंड डोक्यावर घेतला.
-
अभिनय आणि इतर गोष्टींबरोबर कमल यांच्या खासगी आयुष्यातील नातेसंबंधाविषयीसुद्धा बरीच चर्चा झाली आहे.
-
कमल यांनी २ लग्नं केली तर ३ अभिनेत्रींबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलं तरी ते आज सिंगल आहेत. त्यांच्या या लव्ह लाईफबद्दलच आपण जाणून घेऊयात.
-
७० च्या दशकात कमल यांचं नाव त्यांच्या ‘रागांगल’ चित्रपटातील अभिनेत्री श्रीविद्याशी जोडलं गेलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
-
१९७८ मध्ये कमल यांनी अभिनेत्री वाणी गणपथी हिच्याशी लग्नं केलं, पण १० वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला.
-
दरम्यान कमल हासन यांच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एंट्री झाली. या दोघांच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चासुद्धा चांगल्याच रंगल्या.
-
या दोघांच्या लग्नाआधीच त्यांची मुलगी श्रुती हासनचा जन्म झाल्याचंही म्हंटलं जातं. लग्नानंतर अक्षरा हासन हिचा जन्म झाला. कमल आणि सारिका हे दोघेही २००४ साली वेगळे झाले.
-
याबरोबरच कमल हासन यांच्या अफेअरचीदेखील भरपूर चर्चा झाली. कमल यांचं त्यांच्या वयापेक्षा २२ वर्षं लहान अभिनेत्री सिमरन बग्गा हिच्याशी नाव जोडलं गेलं.
-
यांनंतर कमल हासन आणि अभिनेत्री गौतमी यांच्या अफेअरच्या चर्चाही चांगल्याच रंगल्या. बरीच वर्षं ते दोघे लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते, पण २०१६ साली दोघे वेगळे झाले. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की…पाहून पोट धरुन हसाल