-
टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक गेले काही दिवस खूप चर्चेत आहेत.
-
सोशल मीडियावर दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगत आहेत.सानिया मिर्झाने सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या, ज्यानंतर या चर्चांना उधाण आलं.
-
तर काही दिवसांपूर्वी सानियाने मुलगा इझानचा वाढदिवस शोएबसोबत साजरा केला होता. पण शोएबने वाढदिवसाचे फोटो शेअर केले पण सानियाने ते केले नाहीत, म्हणूनही त्यांच्यात काहीतरी बिनसले असल्याचे बोलले जाऊ लागले.
-
पण घटस्फोटांच्या अफवांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत होत्या.
-
काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण हे दोघे घटस्फोट घेत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
या दोघांमध्ये काहीतरी मतभेद झाल्याने ते वेगळे होणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, काही दिवसांतच या अफवा असल्याचे समोर आले.
-
देसी गर्ल प्रियांका चोप्राबद्दलही अशी अफवा काही महिन्यांपूर्वी पसरली होती की ती निक जोनसपासून घटस्फोट घेत आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीही नव्हते.
-
मध्यंतरी शाहिद कपूर एका मुलाखतीत गंमतीत म्हणाला की मीरा त्याला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याचे हे बोलणे वाऱ्यासारखे पसरले आणि ते दोघे विभक्त होणार असल्याच्या अफवा रंगल्या होत्या.
-
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्याही अफवा पसरल्या होत्या. याबद्दल ट्विटरवर प्रश्न विचारणाऱ्या एका नेटकऱ्याला अभिषेकने सडेतोड उत्तर देत अफवांना पूर्णवीराम दिला होता.
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”