-
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत ही लोकप्रिय जोडी आहे. या जोडीचे लाखो चाहते आहेत.
-
सप्टेंबर महिन्यात नवरौत्सवाचा मुहूर्त साधत शाहिद आणि मीराने कुटुंबियांसह वरळी येथील त्यांच्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
-
याआधीही ते जुहू येथील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या घरात राहत होते. परंतु, जुहू बीचवरील गर्दीपासून मुलांना लांब ठेवण्यासाठी तो वरीळीतील नव्या घरी राहायला गेल्याचं बोललं जात होतं.
-
शाहिद आणि मीरा दोघांनी मिळून त्यांच्या या नव्या घराचं इंटेरियर डिझाइन केलं आहे.
-
त्यांच्या या आलिशान घराला ५०० स्क्वेअर फूटची बाल्कनी आहे. शाहिदने नुकतंच त्याच्या घराच्या बाल्कनीतील सूर्यास्ताचा एक फोटो शेअर केला आहे.
-
त्याच्या या फोटोवरुन शाहिदला नवीन घर फारच आवडलं असल्याचं दिसत आहे.
-
शाहिदप्रमाणेच मीराही त्यांच्या नव्या घराच्या प्रेमात आहे, असं म्हणायला हरकत नाही.
-
अनेकदा मीरा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घरातील अनेक फोटो शेअर करत असते.
-
शाहिद आणि मीराच्या आलिशान घरातील किचन.
-
किचनमध्ये स्वयंपाक करतानाचा फोटो मीराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला होता.
-
शाहिदच्या घरातील लिव्हिंग एरिया.
-
दिवाळीच्या निमित्ताने मीराने घरात दिवे आणि मेणबत्ती लावून रोषणाई केली होती.
-
याचे काही फोटोही तिने शेअर केले होते.
-
शाहिद-मीराच्या नव्या घरातील डायनिंग एरियाही फार खास आहे. या एरियाला लागूनच घराची बाल्कनी आहे. (सर्व फोटो : शाहिद कपूर, मीरा राजपूत/ इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”