-
अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी नाट्यसृष्टीमध्ये कार्यरत आहेत.
-
त्यांनी अनेक लोकप्रिय नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.
-
प्रशांत दामले यांनी सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष केला आहे.
-
प्रशांत दामले यांनी १२ हजार ५०० वा नाट्यप्रयोग सादर केल्यानंतर त्यांच्या अनेक जुन्या आठवणींबद्दल खुलासा केला.
-
त्यावेळी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आठवणीत ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
-
“माझी सुरुवात १९८३ पासून पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूरटुर नाटकापासून झाली.”
-
“त्यामुळे त्याचं माझ्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान आहे.”
-
“त्या बरोबर माझं करिअर घडवण्यात सुधीर भट आणि सुयोग या त्यांच्या निर्मिती संस्थेचा महत्त्वाचा वाटा होता.”
-
“हा आधार मला १९९५ ते २००८ या काळात मिळाला.”
-
“तसंच माझ्या आयुष्यात बेस्ट बसचा आणखी एक आधार होता.”
-
“खरं तर मी जेमतेम तीन ते चार वर्षे बेस्टमध्ये काम केलं.”
-
“त्यानंतर सुमारे पाच वर्षे बिनपगारी सु्ट्टी घेतली होती.”
-
“नाटकात काही होत असेल तर बघ, नाही जमल तर परत ये असा विश्वास त्यांनी मला दिला होता. त्यामुळेच मी काम करू शकलो”, असे प्रशांत दामले म्हणाले.
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”